वारखंड-नागझर ग्रामपंचायतीच्या प्रतिनिधींची श्री देवी माऊली शांतादुर्गा देवस्थानाला भेट
वारखंड: वारखंड-नागझर ग्रामपंचायतीच्या सरपंच सौं. कविता कांबळी, उपसरपंच श्री. वसंत नाईक, तसेच पंच सदस्य साबाजी परब, देविदास चारी, रुपेश मावळणकर आणि पंच सदस्या सौं. मयुरी तुळसकर यांनी श्री देवी माऊली शांतादुर्गा देवस्थान कमिटी वारखंड येथे भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
यावेळी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष मुकुंद परब, सचिव बाबलो परब, खजिनदार दत्ताराम परब, मुखत्यार ज्ञानेश्वर परब, उपाध्यक्ष दत्ताराम वसंत परब, सहसचिव साबाजी विष्णू परब, उपखजिनदार सीताराम महादेव परब आणि उपमुखत्यार दयानंद रामचंद्र परब उपस्थित होते.
या भेटीदरम्यान, देवस्थान कमिटी व ग्रामपंचायत यांनी एकमेकांना सहकार्य करण्याचे आवाहन अध्यक्ष मुकुंद परब यांनी केले. देवस्थान आणि स्थानिक प्रशासन यांच्यात समन्वय राखत धार्मिक तसेच सामाजिक उपक्रम राबवण्यावर यावेळी चर्चा झाली.