वारखंड-नागझर पंचायत क्षेत्रात भूमिगत वीज वाहिन्यांबाबत विशेष ग्रामसभा
वारखंड, ७ फेब्रुवारी: वारखंड-नागझर पंचायत क्षेत्रात भूमिगत वीज वाहिन्या टाकण्याच्या कामावर चर्चा करण्यासाठी ग्रामसभा आयोजित करण्यात आली. सरपंच सौ. कविता कांबळी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला उपसरपंच वसंत नाईक, पंच सदस्य साबाजी परब, मयुरी तुळसकर, देविदास च्यारी, रुपेश मावलणकर तसेच श्री शांतादुर्गा देवस्थान समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर परब व मुखत्यार दत्ताराम परब उपस्थित होते.
यावेळी सहाय्यक वीज अभियंता वाटू सावंत, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ते विभागाचे अभियंता श्री. गवस, पाणी पुरवठा विभागाचे अभियंते संदीप मोरजकर यांसारखे सरकारी अधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.
ग्रामसभेत भूमिगत वीज वाहिन्यांमुळे होणाऱ्या संभाव्य अडचणी व त्या सोडविण्याचे उपाय यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थित खाते प्रमुखांनी या कामात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
त्यानंतर अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून वीज वाहिन्या टाकण्यासाठी आवश्यक बदल, अडथळा निर्माण करणाऱ्या वीज खांबांचे व्यवस्थापन आणि संभाव्य खर्च यावर निर्णय घेतला. वीज अभियंत्यांनी खर्चाचा तपशील तयार करून आवश्यक सहकार्य दिले जाईल, असे सांगितले.
ग्रामसभेच्या शेवटी उपसरपंच वसंत नाईक यांनी आभार मानले.
#वारखंड #नागझर #भूमिगतवीज #ग्रामसभा #विकास #पंचायत