श्री रुमडेश्र्वर देवस्थाना सत्कार समारंभ
श्री रुमडेश्र्वर देवस्थान रुमडावाडा- मुरगाव येथे नूकत्याच संपन्न झालेल्या चौथ्या वर्धापन दिनाच्या पाचव्या दिवशी म्हणजे शनिवार दि. 22/2/2025 रोजी येथिल मंदिराचे पूर्व काळापासून जतन करून ठेवलेले भाविक, माजी -आजी अध्यक्ष, देवस्थानाचे शिल्पकार, शहिद सैनिक,माजी मंत्री तसेच साफ-सफाई कामगार यांचा सत्कार प्र. क्र. 5 चे नगरसेवक श्री दामोदर मधु नाईक याच्यातर्फे माजी मंत्री श्री मिलिंद स. नाईक याच्या हस्ते करण्यात आला.
या प्रसंगी व्यासपीठावर माजी मंत्री श्री मिलिंद नाईक, नगरसेवक दामोदर नाईक, श्री राजन नेरुलकर व देवस्थान समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सर्व प्रथम श्री रूमडेश्र्वर दत्तात्रय सास्कृतिक महिला मंडळ अध्यक्षा सौ गायत्री खाजनेकर हिने पुष्पगुच्छ देऊनी सर्व पाहुण्याचे स्वागत केले.सुत्रसंचालक श्री अंकुश स. नाईक यांनी थोडक्यात मंदिराचा इतिहास सांगितला.
या मंदिराला शंभर वर्षाहून अधिक वर्षे झाली यात पूर्व काळी घुमटी रूपात असलेले मंदिर पूजा-अर्चा , साफ-सफाई करुन जतन केल्याबद्दल श्री वासु भि. बांदेकर, कै. अनंत साळगावकर, कै. अर्जुन गडेकर, कै. अर्जुन कांबळी, कै. शांताराम साळगावकर इत्यादिच्या सत्कार त्याच्या मुलांनी स्विकारला तर मंदिराचे शिल्पकार कै.बाबु राघव शेट्ये याचा मंदिराचा पाया व संपुर्ण मंदिराच कामात मोलाचा वाटा उचलल्या बद्दल त्याच्या दोन्ही मुलांना शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन त्याच्या सत्कार करण्यात आला.
देवस्थानचे पहिले माजी अध्यक्ष श्री गोकूळदास वि. मयेकर, दूसरे माजी अध्यक्ष श्री नरेश नाईक, तिसरे माजी अध्यक्ष श्री गुरूदत्त पुं. खाजनेकर व विद्यमान अध्यक्ष श्री जितेंद्र म. मिठभावकर यांच्याही त्यांच्या कुटुबियासोबत शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.रुमडावाडा येथिल पुत्र शहिद ले. नरेद्र आ. मयेकर याच्या मातोश्री श्रीमती भागीरथी आ. मयेकर ,तसेच मंदाराची नित्य नेमाने साफ-सफाई करणारी कामगार सौ कस्तुरी हडपत यांच्याही शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
शेवटी या घुमटिवजा मंंदिराचे भव्य मंदिरात रुपांतर करण्यात ज्यांनी पुढाकार घूऊन मंदिराच्या बांधकामात मोलाचा हातभार लावला व ज्यांच्या राजकारण प्रवेश या मंदिरापासूनच झाला अशा माजी मंत्री श्री मिलिंद सगुण नाईक याच्या सत्कार देवस्थानचे अध्यक्ष श्री जितेंद्र मिठभावकर यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व मानचिन्ह देऊन करण्यात आला.
सत्कार झाल्यावर आपल मनोगत व्यक्त करताना मिलिंद नाईक म्हणाले की ह्या आधी त्याच्या सत्कार करण्याचे खूप प्रस्ताव आले होते पण जेथून आपल्या राजकारण कारकीर्दिला सुरूवात झाली त्याच मंदिरात त्यांना त्याच्या पहिला सत्कार स्विकारायचा अशी त्याची मनोमन ईच्छा होती आणि ती श्री रुमडेश्र्वर देवाने पुर्ण केली व त्यासाठी त्यानी नगरसेवक श्री दामोदर नाईक व देवस्थान समितीचे आभार मानले.