भविष्यात रस्त्याच्या कामाचा दर्जा निकृष्ट राहिल्यास जबाबदारी आमदारांनी घ्यावी

नागझर – पोरस्कडे दरम्यानच्या रस्त्याच्या हॉटमिक्स डांबरीकरणाच्या शुभारंभी कार्यक्रमात आमदार प्रवीण आर्लेकर यांनी वारखंड नागझर पंचायतीच्या सरपंच, उपसरपंच व अन्य दोन पंच सदस्यांना डावलल्याने नागरिकांत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.याविषयीं वारखंड – नागझर पंचायतीच्या सरपंच मयुरी तुळसकर, उपसरपंच वसंत नाईक, पंच सदस्य कविता कांबळी, साबाजी परब यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी पुढे असे म्हटले आहे की नागझर जक्शन ते पोरस्काडे पर्यंतच्या रस्त्याचे काम मार्गी लावून आमदार प्रवीण आर्लेकर यांनी नागझर वारखंड पंचायत क्षेत्रातील विकास काम मार्गी लावल्या बद्दल समाधान व्यक्त केलें मात्र या कामाचा शुभारंभ करताना स्थानिक पंचायतीला डावलल्याबद्दल आमदार महाशयांचा तीव्र शब्दात निषेधही केला आहे. अश्या प्रकारे स्थानिक पंचायतीला डावलून रस्त्याचे काम करणे म्हणजे स्थानिक नागरिकांचा अपमान करण्यासारखे आहे. या रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जा चें झाल्यास स्थानिक पंचायतीला जबाबदार धरू नये. याची जबाबदारी आमदार महाशयानी घ्यावी असेही त्यांनी म्हटले आहे. यापूर्वी याच कच्च्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करताना तसेच अलीकडेच मुख्यमंत्री सहायता निधीतून येथील एकाला आर्थिक सहाय्य देताना आम्हाला डावल ले होती याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली
दरम्यान भाजपा पक्षांध्यक्ष सदानंद तानावडे व मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी यात लक्ष घालून आमदार महाशयना समज द्यावी जेणे करुंन भाजप पक्षावर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही असे या पंचायत क्षेत्रातील नागरिकांचे म्हणणे आहे

Leave a comment